महाराष्ट्र
सहकार महर्षी स्व. दादापाटील राजळे स्मृती व्याख्यानमालेचे महाविद्यालयात आयोजन
By Admin
सहकार महर्षी स्व. दादापाटील राजळे स्मृती व्याख्यानमालेचे महाविद्यालयात आयोजन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व सहकार महर्षी स्व. दादापाटील राजळे यांची १०० वी जयंती निमित्त स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन शनिवार दि. 20 ऑगस्ट, ते सोमवार दि. 22 ऑगस्ट तीन दिवस पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील दादापाटील राजळे महाविद्यालय येथे करण्यात आले आहे.
व्याख्यानमालेचे उद्घाटन मा. प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, जेष्ठ साहित्यिक, सातारा यांचे 'जीवन त्यांना कळले हो..' या विषयावरील व्याख्यानाने होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार मोनिकाताई राजीवजी राजळे , शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघ, या भूषवणार आहेत. तर मा. सुभाषराव ताठे पाटील विश्वस्त दादा पाटील राजळे शिक्षण संस्था यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दि.21आँगस्ट रोजी व्याख्यानमालेचे दुसरे व्याख्यान मा. श्री यशवंत शितोळे, संचालक, अध्यक्ष 'महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र', कोल्हापूर, यांच्या 'करियर कट्टा यशस्वी जीवनाचा मंत्र', या विषयावर ते प्रबोधन करणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.श्री उद्धवराव वाघ, विश्वस्त श्री दादा पाटील राजळे शिक्षण संस्था हे भूषवणार आहेत. याप्रसंगी प्रा. डॉ. एकनाथ खांदवे मा. प्राचार्य, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. व्याख्यानमालेचा समारोप सोमवार दि.२२ ऑगस्ट रोजी सकाळी10=30 वा.स्व. दादापाटील राजळे यांचा जयंती सोहळा, स्व.सौ. चंद्रभागाबाई दादापाटील राजळे सेवाभावी संस्थेच्या वतीने, गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सहकार महर्षी स्व.दादा पाटील राजळे राज्यस्तरीय उत्कृष्ट संत साहित्य पुरस्काराचे वितरण,तसेंच प्रगतशील ऊस, दूध, फळे उत्पादक शेतकरी पुरस्काराचे वितरण भागवताचार्य, अशोकानंद कर्डिले महाराज, चिचोंडी पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, मा.आ.आप्पासाहेब राजळे हे भूषवणार आहेत. या प्रसंगी आमदार मोनिकाताई राजळे,मा.श्री रामकिसन काकडे विश्वस्त, श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्था, सर्व संचालक मंडळ, विश्वस्त उपस्थित राहणार आहेत. तरी या व्याख्यानमालेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आव्हान विश्वस्त मा. राहुलदादा राजळे, सचिव मा. आर.जे.महाजन, स्व.सौ. चंद्रभागाबाई दादापाटील राजळे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव राजळे, डॉ अण्णा साहेब शिंदे कृषी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. युवराज सुर्यवंशी, प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी केले आहे.
Tags :
214
10