ऊसाचा ट्रॅक्टर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पलटी होवून कारवर उलटला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नेवासा - ऊसाने भरलेला ट्रॅक्टर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पलटी होवून कारवर ऊस कोसळल्याने तीन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील मुरमे - देवगड रस्त्यावरील बावके वस्तीजवळ शनिवार (दि.१२) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडला.
अपघातग्रस्तांना परिसरातील शेतकऱ्यांनी वेळीच प्रसांगवधान दाखवून मदत केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, मुरमे येथून ऊसाने भरलेला ट्रॅक्टर देवगडच्या दिशेने जात असताना देवगडकडे दर्शनासाठी चाललेल्या कारवर खड्ड्यांमुळे ट्रॅक्टर पलटी झाला कारच्या अंगावर ऊस पडल्यामुळे अपघाताच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी धाव घेतली व ऊस बाजूला सारण्यासाठी वेळीच मदत केल्याने पुढील अनर्थ टळला. या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले असून कारचे मोठे नुकसान झाले आहे.
ऊस वाहतुकीसाठी हल्ली डब्बल ट्रॉली ट्रॅक्टरचा उपयोग साखर कारखाने करुन घेत असून या ट्रॅक्टरवरील चालकही अल्पवयिन असल्याचे अनेकदा निदर्शनास येते. मोठ्या आवाजात गाणे लावून ट्रॅक्टर चालवत असल्यामुळे पाठीमागून घेणारे वाहने समजत नसल्यामुळे अपघातात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अपघात प्रकरणी नेवासा पोलीसांकडे चौकशी केली असता माहीती घेवून सांगतो, असे उत्तर मिळाल्याने नेवासा पोलीसांचे पुन्हा एकदा वराती मागून घोडे दामटण्याचा प्रत्यय आला आहे.