पाथर्डीत युक्रेनहून सुखरूप पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील अनेक विद्यार्थी युक्रेन देशांमध्ये एमबीबीएस पदवीचे शिक्षण घेण्यासाठी गेले होते. परंतु रशिया व युक्रेन देशात युद्ध चालू असल्याने सर्वच विद्यार्थी मायदेशी सुखरूप पोहोचत आहेत.
पाथर्डी तालुक्यातील जे विद्यार्थी मायदेशी सुखरूप पोहोचले आहेत, त्यांचा पाथर्डी तालुक्यात स्वागत करून त्यांचा सत्कार शिवसेना तालुकाध्यक्ष अंकुश चितळे यांनी केला. मायभूमीत सुखरूप पोहोचलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिवसैनिकांनी त्यांचा सन्मान केला. युक्रेन ला शिक्षण घेण्यासाठी गेलेला विद्यार्थी आपल्या घरी सुखरूप पोहोचल्यामुळे त्यांच्या आई-वडिलांना खूप आनंद झाला होता.
पाथर्डी तालुक्यातील शिवसैनिकांनी पूजा बोरुडे, दर्शन आंधळे, रितेश घोडके या सर्वांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांचा शिवसेनेच्यावतीने सन्मान केला.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अंकुश चितळे, प्रहारचे तालुकाप्रमुख शिवाजी बडे, आप्पासाहेब चितळे, विशाल कोलते, अशोक मरकड बंडू हंडाळ, अक्षय दत्ता पवार, ज्ञानेश्वर कर्डिले आदींची उपस्थिती होती.