जागतिक महिला दिन 8 मार्च दिनानिमित्त कासार पिंपळगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
महीला आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर
पाककला स्पर्धा ,निबंध रांगोली स्पर्धा ईश्रमकार्ड नोंदणी कार्यक्रम
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे मंगळवार दि. 8 मार्च रोजी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत महीला आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर,पाककला स्पर्धा विद्यार्थ्यांनीसाठी निबंध रांगोळी स्पर्धा तसेच ईश्रमकार्ड नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आरोग्य तपासणी मध्ये CBC (रक्त तपासणी) BSL (रक्तातील साखर तपासणी) T3T4 (थाॕयरड चाचणी ) इतर आवश्यक चाचणी तसेच
विद्यार्थ्यांनीसाठी निबंध स्पर्धा विषय
वृक्षाचे मानवी जीवनातील महत्त्व
प्रदुषण एक समस्या
माझी वसुंधरा अभियान
लेक वाचवा लेक शिकवा
स्ञी पुरुष समानता
हे विषय आहेत.
रांगोली विषय पुढील प्रमाणे
स्ञी भूण हत्या - भारतीय सण उत्सव
माझी वसुंधरा अभियान
Happy woman day
आजादीचा 75 वा अमृतमहोत्सव
सलाम स्ञी शक्तीला
उत्कृष्ट कलाकृतीस पारीतोषिक व सन्मान पञ देण्यात येईल.माञ पाककृती घरुन बनवून आणने आवश्यक आहे.
या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक पाथर्डी शेवगावच्या आमदार मोनिकाताई राजळे तसेच मार्गदर्शन गटविकास अधिकारी पाथर्डी शितल खिंडे, एम डी आयु डाॕ.अंबिका वाघ/वाकचौरे, सीएचओ स्नेहल घाडगे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच सौ.मोनालीताई राजळे, ग्रामविकास अधिकारी प्रमोद म्हस्के, उप सरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी केले आहे.