पाथर्डीत छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
पाथर्डी- प्रतिनिधी
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत करणारे आरक्षणाचे जनक, हिन- दिन उपेक्षित व दुबळ्यांचे कैवारी, समतेचे महामेरू लोकराजे राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांची जयंती डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पाथर्डी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेला उपस्थितांच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या जीवनावर व लोककल्याणकारी कार्यावर मान्यवरांनी विचार मांडले.
या कार्यक्रमाचे आयोजक तथा बौद्धाचार्य वसंतराव बोर्डे, प्रा. श्रीकांत काळोखे ,महेद्र राजगुरू, निपाणी जळगावचे सरपंच नितिन गर्जे, विनोद थोरात, हाजी हुमायुन आतार, प्राचार्य गौतम ढेकणे, कैलास वेलदोडे, लहानु मोरे, सुभाष तारळकर, विजु खंडागळे, आनंद उबाळे आदी उपस्थित होते.