वरंवडी शिवारात आढळला तब्बल ९ फुटी अजस्त्र अजगर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील वरंवडी शिवारातील थापलिंग घाटालगत ९ फूट लांबी व ७ किलो वजन असलेला अजस्त्र अजगर (Python Found in Sangamner) आढळला. सर्पमित्र शिवप्रसाद पवार याने वन विभागाच्या मदतीने या अजगराला निसर्गात मुक्त केले आहे.
तर परिसरात अजगर आढळल्याची ही पहिलीच घटना असल्याचे अनेकांनी सागितले.
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील वरंवडी शिवारातील थापलिंग घाटालगत ९ फूट लांबी व ७ किलो वजन असलेला अजस्त्र अजगर (Python Found in Sangamner) आढळला. सर्पमित्र शिवप्रसाद पवार याने वन विभागाच्या मदतीने या अजगराला निसर्गात मुक्त केले आहे. तर परिसरात अजगर आढळल्याची ही पहिलीच घटना असल्याचे अनेकांनी सागितले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, विशाल नामदेव शिंदे हे वरंवडी शिवारातील थापलिंग घाटाच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल नवरत्न येथून जात असताना एक मोठा साप रस्ता ओलांडताना दिसला. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे ओळखून शिंदे यांनी स्थानिक नागरिकांना याबाबत माहिती देऊन सर्पमित्र शिवाप्रसाद पवार यांना संपर्क केला.
मध्यरात्री झाली असतानाही घटनेचे गांभीर्य ओळखत सर्पमित्र शिवाप्रसाद पवार हे घटनास्थळी दाखल झाले. थोड्या वेळातच मोठ्या शिताफीने या सापाला ताब्यात घेऊन हा अजगर असल्याची माहिती उपस्थितांना दिली.
दरम्यान, सकाळी वनक्षेत्र अधिकारी एस. एस. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बबन मंचरे व वनरक्षक रामकृष्ण सांगळे यानी या अजगराला ताब्यात घेऊन हा ३ वर्षीय मादी अजगर असल्याची माहिती दिली. सर्पमित्र शिवाप्रसाद पवार व डॉ. अनिल क्षीरसागर यांच्या मदतीने त्याला निसर्गात मुक्त केले.