महाराष्ट्र
जिल्हा परीषदेच्या विनाटेंडर कामाकडे कोण करतेय दुर्लक्ष?
By Admin
जिल्हा परीषदेच्या विनाटेंडर कामाकडे कोण करतेय दुर्लक्ष?
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात बांधकाम विभागाने विना टेंडर व विना परवानगी कामे करण्याचा पायंडा सुरू केला आहे. आतापर्यंत दोन अधिकाऱ्यांच्या दालनाचे नुतनीकरण व काही दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. तसेच नव्याने एक दालन उभारण्यात येत आहे. ही तीनही कामे विना परवानगी व विना टेंडरच केलेले आहे. त्यातील दोन अधिकाऱ्यांच्या दालनांचे नुतनीकरणाचे कामे झाल्यानंतर टेंडर करून बिले मंजूर करण्यात आलेली आहेत. विशेष म्हणजे ही सर्व कामे पदाधिकारी सत्तेत असताना झालेली असूनही, त्यांचेही त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. यातील काही कामे एकाच व्यक्तीकडून करून घेण्यात आल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे यामध्ये कोठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अहमदनगर जिल्हा परिषदेत (Ahmednagar Zilla Parishad) सध्या अधिकाऱ्यांचे दालने विनाटेंडर व विना परवानगी करण्यात प्रशासन व्यस्त आहे.
मात्र इमारतीच्यासह परिसराच्या देखभाल दुरुस्तीकडे मात्र जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. यामुळे चांगली वास्तुची दुरवस्था होत असल्याचे चित्र दिसून येत असून, यावर अभ्यागतांसह आता कर्मचाऱ्यांमधूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या पाठीमागील बाजुने चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याच भागातून ड्रेनेजची लाईन गेलेली असून, त्यावर सिमेंटचे ढापे बसविण्यात आलेले आहेत. त्यातील काही ढाप्यांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे वाहने पंक्चर होत आहे. याबाबत काहींनी तक्रारी केलेल्या आहेत. मात्र त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष झालेले आहे. इमारती व परिसराच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देण्याऐवजी सध्या अधिकाऱ्यांची दालने सुसज्य करण्यावर भर देला जात आहे.
रात्री केले जातेय 'त्या' दालनाचे काम
जिल्हा परिषदेतील विना टेंडर व विना परवानगी होत असलेल्या दालनाचे कामकाज रात्रीच्या वेळी करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे 'बांधकाम'चे अधिकारी दिवसा पहाणी करून रात्रीचे कामकाज करून घेत आहे, अशी चर्चा सध्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.
जिल्हा परिषदेच्या २५ फेब्रुवारीला झालेल्या अर्थसंकल्पी सभेत विनापरवागनी व विना टेंडर केलेल्या कामाचा विषय उपस्थित केला होता. या प्रकरणाची तपासणी करून व संबंधितांवर जबाबदारी निश्चत करून कारवाई करण्याचे सभेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. त्यावर प्रशासनाने काय कारवाई केली आहे यासाठी आपण पत्रव्यवहार सामान्य प्रशासनाकडे केला आहे.
- राजेश परजणे, माजी सदस्य, जिल्हा परिषद
जिल्हा परिषदेच्या आवारात झालेल्या दुरवस्थेची दुरुस्ती करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. मान्सून पूर्व कामात नाल्यांची सफाई केली जाणार असून, त्यावरील ढापेही दुरुस्त केले जातील.
- शिवाजी राऊत, सहाय्यक अभियंता, नगर तालुका
Tags :
287
10