छत्रपती शिवरायांच्या विचारावरच स्वाभिमानी मराठा महासंघाची वाटचाल : अंकुश डांभे
पाथर्डी- प्रतिनिधी
छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना बरोबर घेऊन स्वराज्य उभे केले आणि स्वराज्य निर्माण करून प्रत्येक मावळा जिव्हाळ्याने जोडला त्याच पद्धतीने स्वाभिमानी मराठा महासंघ वाटचाल करत आहे. तळागाळातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालण्याची तयारी संघटनेने केली आहे. स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले यांच्या नेतृत्वाखाली राज्यात लवकरच मराठा जोडो अभियान सुरु करणार आहे. नगर जिल्ह्यामध्ये गाव तेथे शाखा हा उपक्रम राबविण्यात येईल असा संकल्प स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे यांनी व्यक्त केला.
पाथर्डी तालुक्यातील ढवळेवाडी येथे छत्रपती शिवरायांचे प्रतिमा पूजन करून स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवजयंती साजरी केली. त्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डांभे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते संदीप माने होते. याप्रसंगी स्वाभिमानी मराठा मह्संघाचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले, युवक जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड, जिल्हा समन्वयक प्रा. संजय अकोलकर आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी राहुल दुसंग, दादा थिटे, केतन डांभे, अक्षय दुसंग, सोमनाथ थिटे, अनिरुद्ध थिटे आदींनी परिश्रम घेतले.