खासदार संजय राऊत अटकेच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध
पाथर्डी - प्रतिनिधी
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना आकसबुद्धीने अटक केल्याबद्दल तसेच राज्यपाल कोश्यारी यांनी घटनात्मक पदावरून महाराष्ट्राचा व मराठी माणसाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ पाथर्डी तालुका शिवसेनेच्या वतीने प्रांत अधिकारी देवदत्त केकाण यांना शिवसेना तालुकाप्रमुख भगवानराव दराडे यांनी निवेदन दिले.त्यावेळी तहसीलदार श्याम वाडकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना आकसबुद्धीने केलेली अटक व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घटनात्मक पदावरून महाराष्ट्राचा व मराठी माणसाचा अपमान करून प्रांतीयवाद निर्माण केला. या दोन्ही घटनांचा आम्ही शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत. या निवेदनाद्वारे आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत. असे या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख भगवानराव दराडे, उपतालुकाप्रमुख उद्धव दुसंग, शिवसेना दलित महाआघाडीचे अंबादास आरोळे, माजी शहरप्रमुख भाऊसाहेब धस, सुनिल परदेशी ,अक्षय उराडे ,शहर प्रमुख सागर राठोड, संभाजी जेधे ,अजिनाथ गीते, अनिल भापकर, अजिनाथ भापकर, आदेश काकडे, सुरेश हुलजुते, महादेव राहटे, सुभाष कराळे आदिंच्या साह्या आहेत.