इलेक्ट्रिक पोलवरील ॲल्युमिनियम तारा चोरणाऱ्या दोन भामट्यांना अटक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
इलेक्ट्रिक पोलवरील ॲल्युमिनियम तारा चोरणाऱ्या दोन भामट्यांच्या गंगापूर पोलिसांनी आठ दिवसांत मुसक्या आवळल्या त्यांच्याकडुन मुद्देमाल व रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर हद्दीतील भेंडाळा शिवारात दत्ता वरकड यांची शेतातील गट नंबर 158 मधील सहा इलेक्ट्रिक पोल वरील विद्युत ऍल्युमिनियम तारा १ ऑगस्ट ते २ ऑगस्ट रोजीच रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती या प्रकरणी भेंडाळ्याचे विद्युत वितरणचे उपअभियंता मंगेश बाविस्कर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपी रहमान अब्दुल तांबटकर राहणार जवळ अहमदनगर, कोंडीराम गायकवाड राहणार जळगाव तालुका नेवासा शंकर मोहन घोरपडे रामवाडी अहमदनगर यांना ६ ऑगस्ट रोजी गंगापूर पोलिसांनी अटक केली त्यांच्या ताब्यातुन ७५ किलो अल्युमिनियम ची तार अंदाजे किंमत २० हजार रुपय तसेच चोरीचा माल घेऊन जाणारी रिक्षा क्रमांक एम एच १६ बीसी ०६१४ असा माल आरोपींची ताब्यातून जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश काथार पोलीस कॉन्स्टेबल राहुल वडमारे हे करीत आहेत