राजकारणात चांगली माणसं आली पाहिजेत भास्करराव पेरे
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील भालगांव येथील परिवर्तन प्रतिष्ठान गणेश मंडळाने गणपतीची प्रतिष्ठापना केली होती. लोकनियुक्त सरपंच डॉ. मनोरमा खेडकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी गणेश उत्सवाच्या कार्यक्रमात आदर्श सरपंच भास्करराव पेरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते.
यावेळी भास्करराव पेरे यांनी व्याख्यानात म्हटले की, गावचा विकास हा सरपंच व ग्रामस्थांच्या हातामध्ये असतो. तुमच्या गावाला आदर्श करण्यासाठी तुमच्यात एकी हवी. ज्याने विकासाचा ध्यास घेतला त्याला मदत करणारे ग्रामस्थ मिळाले की, गाव आदर्श होण्यास वेळ लागत नाही. राजकारणात चांगली माणसं आली पाहिजेत व ती टिकलीही पाहिजे, असे प्रतिपादन भास्करराव पेरे यांनी केले.
या कार्यक्रमात परिवर्तन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व सरपंच डॉ. मनोरमा खेडकर, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, कमलाकर कासुळे, जगन्नाथ खेडकर, चेअरमन भिमराव कासुळे, गहिनीनाथ खेडकर, नामदेव खेडकर, दिलीप खेडकर (दुकानदार), भारत खेडकर, उद्धव खेडकर, संजय बेद्रे, तुकाराम खेडकर, बाळासाहेब नागरे, सिताराम खेडकर, अभिमान खेडकर, पंढरीनाथ खेडकर, माणिक बटुळे आदींची उपस्थिती होती.
गणपती उत्सवामध्ये अमरावती येथील समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला.
प्रास्ताविक गहिनीनाथ खेडकर यांनी केले तर आभार संजय बेद्रे यांनी मानले.
भालगावात सामाजिक कार्यातून विकासाची घोडदौड सुरू आहे. विकासाची कामे करून आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. गावचा विकास करून आम्ही भालगाव व परिसरातील गावांमध्ये विकासाची गंगा घेऊन जाणार आहोत.
-माणिकराव खेडकर
भाजपा तालुकाध्यक्ष, पाथर्डी.