महाराष्ट्र
ग्रामपंचायत निवडणूक- 203 8 हजार 376 अर्ज ; सोमवारी छाननी
By Admin
ग्रामपंचायत निवडणूक- 203 8 हजार 376 अर्ज ; सोमवारी छाननी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी शुक्रवारी इच्छुक उमेदवारांची झुंबड उडाली होती.
आतापर्यंत सरपंचपदाच्या 203 जागांसाठी 1 हजार 282 तर 1 हजार 922 सदस्यपदांसाठी 7 हजार 94 अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, निवडणूक रिंगणातील चित्र बुधवारी स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतींच्या 18 डिसेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीाकरण्यास प्रारंभ झाला. उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरणे बंधनकारक असल्यामुळे इच्छुक उमेदवारांची कॅफेवर गर्दी झाली.
परंतु सर्व्हर सातत्याने बंद पडत असल्याने निवडणुकीपासून वंचित राहावे लागेल अशी भीती निर्माण झाली होती. मात्र, निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज ऑफलाईन भरण्यास मुभा देत दिलासा दिला. त्यामुळे गुरुवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास वेग आला. त्यामुळे गुरुवारी तिसर्या दिवसापर्यंत सदस्यपदासाठी 2 हजार 42 तर सरपंचपदासाठी 397 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. निवडणूक आयोगाने साडेपाच वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यास मुभा दिली. त्यामुळे प्रत्येक तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली होती.
महिलांसाठी 50 टक्के जागा असल्याने, महिलांही मोठ्या संख्येने अर्ज दाखल करण्यासाठी तालुकास्थळी आल्या होत्या. नगर तालुक्यातील वाळकी, पांगरमलसह 27 गावांतील इच्छुकांनी समर्थकांसह तहसील कार्यालयात गर्दी केली होती. या गर्दीला आवर घालण्यासाठी शेवटी तहसीलदार उमेश पाटील यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली
तालुकानिहाय दाखल झालेले सदस्यपदासाठीचे अर्ज. कंसात सरपंच पदासाठीचे अर्ज –
अकोले 192 (48), संगमनेर 1325 (251), कोपरगाव 878 (159), श्रीरामपूर 162 (39), राहाता 425 (71), राहुरी 493 (88), नेवासा 505 (69), नगर 751 (150), पारनेर 638 (103), पाथर्डी 414 (64), शेवगाव 410 (70), कर्जत 300 (50), जामखेड 132 (26), श्रीगोंदा 469 (94).
Tags :
2469
10