महाराष्ट्र
आठ वर्षापासून फरार व खून, मोक्का गुन्ह्यात असलेला 'या' आरोपीला बेड्या
By Admin
आठ वर्षापासून फरार व खून, मोक्का गुन्ह्यात असलेला 'या' आरोपीला बेड्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
भरत विठ्ठल एडकेला पुण्यातील कोडरुडमधून अटक करण्यात आली. भरत एडकेविरोधात मीरारोड, भाईंदर, पुण्यासह अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड, श्रीगोंदा तालुक्यात खून आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.
खून आणि मोक्का गुन्ह्यात तब्बल आठ वर्षांपासून फरार आरोपी भरत विठ्ठल एडके याला बेड्या ठोकण्यात अहमदनगर पोलिसांना यश आलं आहेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर फैजल खान, बेलवंडी इथलं आकाश मापारी हत्याकांड आणि नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका शिवसेना प्रमुख शंकर पाटील ठाणेकर हत्याकांडासह मोक्का गुन्ह्यात आठ वर्षांपासून भरत विठ्ठल एडके फरार होता. सप्टेंबर 2014 मध्ये जामखेड बीड रोडवरील मोहागाव शिवारात भालचंद्र नाईक यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून मारहाण केली, यात त्यांचा मृत्यू झाला होता. तर पुणे इथले बिल्डर फैजल खान यांचा 65 एकर जमिनीच्या वादामधून सुपारी घेऊन खून केला होता. तसंच ढवळगांव फाटा येथील आकाश मापारी यांचं अपहरण करुन खून झाला होता. या गुन्ह्यासह विविध पोलीस ठाण्यात मोक्का, खून, खुनासह दरोडा, दरोडा, जबरी चोरी असे एकूण 10 गुन्ह्यात भरत विठ्ठल एडके हा फरार होता. त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलं.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या माहितीनुसार, 'गंभीर गुन्ह्यात गेली आठ वर्षे फरार असलेला भरत एडके हा आरोपी पुण्यातल्या कोथरुडमध्ये एका केटरर्सकडे काम करत असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. आरोपी भरत एडके हा कोथरुडमधील चांदणी चौक इथे येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार अहमदनगर एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके आणि त्यांच्या विशेष पथकातले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे, गणेश इंगळे, सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोलीस हेड काँस्टेबल बापूसाहेब फोलाने, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक भीमराज खर्से, सुरेश माळी, रवि सोनटक्के, चालक पोहेकाँ चंद्रकांत कुसळकर यांनी सापळा रचला आणि भरत एडके शिताफीने अटक केली.
आरोपी भरत एडकेविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 396, 341, 323, 504, 506 सह आर्म्स अॅक्ट 3/25 महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियन 1999 चे (मोक्का) चे कलम (3) (1) (II), 3 (2) आणि (4) प्रकरणी गुन्हा दाखल आहे. भरत एडके हा सराईत गुन्हेगार असून मोक्का, खून, खुनासह दरोडा, दरोडा, जबरी चोरी असे एकूण 10 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
Tags :
731
10