Breaking- ट्रकने दुचाकीला चिरडले; दुचाकीवरील दोन तरुण ठार , धक्कादायक घटना
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
उद्धव तेलोरे व बाळकृष्ण तेलोरे अशी मयतांची नावे आहेत. दुचाकीवरील मयत हे पाथर्डी तालुक्यातील (कोल्हूबाईचे कोल्हार) येथील असल्याचे समजते. नगरच्या दिशेने येणार्या मालट्रकने दुचाकीला पत्रकार चौकात धडक दिली.
नगर-मनमाड रोडवरील पत्रकार चौकात ट्रकने दुचाकीला चिरडले. या अपघातात दुचाकीवरील दोघे ठार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एक वर्षांपूर्वी एसटी बस मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेले वाहन चालक सुभाष तेलोरे यांचा उद्धव हा मुलगा व बाळकृष्ण हा पुतण्या असून तीन ते चार महिन्यांपूर्वी अपघातात मृत झालेले अहमदनगर एसटी आगाराचे कंट्रोलर राहिलेले श्रीकांत तेलोरे यांचा बाळकृष्ण हा मुलगा व उद्धव हा पुतण्या आहे.
त्यामुळे एक वर्षाच्या आतच दोन सख्खे भाऊ व त्या दोघांच्याही मुलांचे अपघातात निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
दुचाकीवरील असलेल्या दोघांचा यामध्ये जागीच मृत्यू झाला. आज दुपारी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तोफखाना, शहर वाहतुक शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वाहतुक कोंडी झाली होती.