महाराष्ट्र
माझा मेळावा डोंगरात, ना खुर्च्या ना जेवण, लोकं घरातून भाकरी बांधून आणणात"- पंकजा मुंडे
By Admin
माझा मेळावा डोंगरात, ना खुर्च्या ना जेवण, लोकं घरातून भाकरी बांधून आणणात"- पंकजा मुंडे
"तुमच्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्याचीही माझी ऐपत नाही", पंकजा मुंडेंचं विधान
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
दरवर्षी दोन दसरा मेळावे असायचे, जो मी एक दुपारी घेत, तर दुसरा मुंबईत होत. यावर्षी आणखी एक मेळावा होत आहे, एकनाथ शिंदेंचा. मी सर्वांना शुभेच्छा देते, तसेच या सर्व मेळाव्यातून जनतेचे आणि वंचितांचे, पीडितांचे विषय प्राधान्याने घेतली जातील हीच अपेक्षा. माझा मेळावा हा गरिबांचा, वंचिताचा असून गावकडचा साधारण मेळावा आहे. इथे ना खुर्च्या लागल्या आहेत, ना खाण्या-पिण्याची व्यवस्था आहे. लोकं आपल्या घरातूनच भाकरी बांधून आणतात. माझ्यासाठी ही वेगळीच ताकद आहे, मला मोठा आशीर्वाद आहे, असे पंकजा यांनी म्हटले. पंकजा यांनी आपल्या मेळाव्यातील सर्वसामान्य लोकांची भावना व्यक्त करताना मुंबईच्या मेळाव्यातील शानशौकतीवर एकप्रकारे निशाणाही साधला.
आमचा मेळावा डोंगरात होतो, डोक्यावर ऊन असतं, तरीही लोकांचा उत्साह असतो, असा माझा मेळावा असतो. माझा मेळावा हा पक्षाचा नसून वंचितांचा आहे. मी दसरा मेळाव्याची सर्वांचीच भाषणं ऐकायला उत्सुक आहे, मी दोन्ही शिवसेना नेत्यांची भाषण ऐकणार आहे. त्यानंतर, माझंही भाषण टीव्हीवर ऐकणार आहे, असे पंकजा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
दरम्यान, त्यांनी आपल्या भाषणातून २०२४ च्या निवडणुकीत लढण्याचे संकेत दिले आहेत. भारतीय जनता पार्टीनं आपल्याला तिकीट दिलं तर २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी दसरा मेळाव्यासाठी हजर झालेल्या लोकांना बसण्यासाठी खुर्च्याची व्यवस्था करण्याचीही आपली ऐपत नाही, असं विधानंही केलं आहे.
त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, “हकीकत को तलाश करना पडता हैं, अफवा तो घर बैठे बैठे मिल जाती हैं. इथं जमलेले लोक ही माझी ‘हकीकत’ आहे, माझी शक्ती आहे. माझ्याकडे तुम्हाला बसायला द्यायला खुर्च्या नव्हत्या, तुमची व्यवस्था करण्याची माझी ऐपत नाही. तुम्ही दाटीवाटीने इथं बसला आहात. खुर्च्या लावल्या असत्या तर हा मेळावा किती मोठा झाला असता. किमान चारपट तरी झाला असता. तुम्ही जमिनीवर बसणं गोड मानलं, मी तुमचे आभार मानते, असं पंकजा मुंडे भाषणातून म्हणाल्या.
दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.
दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत. तर, बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे पंकजा मुंडेंचादसरा मेळावा होत आहे. येथील भगवान भक्ती गडावर खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. त्यासाठी, बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील हजारो कार्यकर्ते जमले आहेत. त्यामुळे, यंदा एकूण तीन दसरा मेळावे होत आहेत
Tags :
728
10