महाराष्ट्र
149
10
शेवगाव तालुक्यातील रस्ते कामाप्रती लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
By Admin
शेवगाव तालुक्यातील रस्ते कामाप्रती लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
चापडगाव - मंगरूळ रस्त्याची मोठी दुरावस्था
जि.प.सदस्या सौ.काकडे यांची जिल्हा परिषदेकडे रस्ता दुरुस्तीची मागणी
शेवगाव - प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील राज्य मार्ग ५० ते नागरे वस्ती ते मंगरूळ बु आणि रा.मा.५० ते सोनेसांगवी ते वरखेड ते मंगरूळ बु या दोन्ही रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून रस्त्याअभावी ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत होत आहे. या रस्त्याचे तातडीने खडीकरण व डांबरीकरण करावे या आशयाचे निवेदन जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांना दिले आहे. यावेळी एकनाथ शिरसाठ, उद्धव शिरसाठ, मोहन नागरे, बाबासाहेब काळे, शाहूराव नजन, भागीनाथ शिरसाठ, संदीप खरमाटे, भिवसेन काळे, पांडुरंग तेलोरे, गोवर्धन काळे, योगेश नागरे, अमोल नागरे, काकासाहेब नागरे, अर्जुन नागरे, शहादेव नागरे, रामकिसन शिरसाठ, गणेश नागरे, सुनील नागरे, सौ.सुभद्राबाई शिरसाठ, सौ.द्वारकाबाई शिरसाठ, वर्षा शिरसाठ, अनिता नागरे, शांताबाई नागरे, अप्रुकाबाई नागरे, शोभाताई नागरे आदि महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, शेवगाव तालुक्यातील रा.मा.५० ते नागरे वस्ती ते मंगरूळ बु. व रा.मा.५० ते सोनेसांगवी ते वरखेड ते मंगरूळ बु हे दोन्ही रस्ते सुमारे ५ कि.मी. अंतराचे आहेत. यामधील रा.मा.५० ते नागरे वस्ती रस्त्यावर मी स्वतहा जि.प.सदस्या या नात्याने दोन वेळेस स्वखर्चातून मुरुमीकरणाचा भराव करून या रस्त्याची दुरुस्ती केलेली आहे. परंतु रस्त्यावर मोठी रहदारी असल्याने रस्ता खराब झाला आहे. रस्ता हा नागरिकांचे मुलभूत गरज व हक्क असताना रस्त्याचे डांबरीकरण का होत नाही असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. तर या कामाप्रती लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसत आहे. सदरच्या रस्त्यावर अनेक लोकवस्त्या असल्याने येथील वस्तीवरील नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना दळणवळण करण्यासाठी चापडगाव व शेवगावला जावे लागते. परंतु सदरचे रस्ते खराब झाल्यामुळे नागरिकांची रस्त्याअभावी मोठी अडचण आहे. येथील नागरिकांना पर्यायी रस्ता नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. तरी या प्रश्नाकडे वैयक्तिक लक्ष घालून तातडीने सदरच्या रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करावे असेही निवेदनात म्हंटले आहे.
चौकट - जि.प.सदस्या या नात्याने सौ.हर्षदाताई काकडे यांनी व्यक्तिगत खर्चातून दोन वेळेस या रस्त्याचे भराविकरण करून दुरुस्ती केली. परंतु इतर लोकप्रतिनिधींनी एकदाही आमच्याकडे डोकावून पाहिले नाही. ग्रामस्थांच्या जीवाशी चाललेला हा खेळ लोकप्रतिनिधीं अजून किती दिवस खेळणार आहेत ? आपण सत्ता उपभोगतो याची थोडी तरी जाण लोकप्रतिनीधींनी धरली पाहिजे. :- भागीनाथ शिरसाठ, ग्रामस्थ, नागरे वस्ती.
Tags :

