शेवगाव- गरजू व कामगारांसाठी अल्प दरात महा इ-श्रम कार्ड ऑनलाईन काढून देण्याच्या कार्यालयाचे उद्घाटन
शेवगाव- प्रतिनिधी
भारत सरकार गरजू व कामगारांसाठी इ- श्रम योजना राबवत असून या योजनेचा तालुक्यातील गरीब, गरजू व कामगारांनी फायदा घ्यावा. त्यानुसार जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने शेवगाव तालुक्यातील गरजू व कामगारांसाठी अल्प दरात महा इ-श्रम कार्ड ऑनलाईन काढून देण्याच्या कार्यालयाचे आज शेवगाव येथे उद्घाटन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड.डॉ.शिवाजीराव काकडे यांनी केले.
आज दि.(२१) रोजी शेवगाव येथे जनशक्ती विकास आघाडीच्या कार्यालयात गरजू व कामगारांसाठी अल्प दरात इ-श्रम कार्ड काढण्याच्या कार्यालयाचे आज उद्घाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल साठे हे होते तर कार्यक्रमासाठी जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे, देवराव दारकुंडे, नवनाथ ढाकणे, जनशक्ती उद्योग आघाडीचे अध्यक्ष अशोकराव ढाकणे, जनशक्ती युवा आघाडीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण पातकळ, अकबर शेख, वैभव पूरनाळे, जनशक्ती श्रमिक संघाचे अध्यक्ष प्रा.सखाराम घावटे, संचालक नवनाथ खेडकर, दुर्गाजी रसाळ, राजेंद्र लोणकर, मनोज घोंगडे, विनोद मोहिते, आबासाहेब काकडे, रघुनाथ सातपुते, पै.सतिश दसपुते, गोरख गव्हाणे, रामदास विखे, भागचंद कुंडकर, भारत भालेराव, राजेंद्र फलके, विश्वास ढाकणे, शिवाजी औटी, मारुती वाघ, भिवसेन केदार, ज्ञानेश्वर खराडे, ज्ञानेश्वर फसले यांच्यासह जनशक्तीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना अॅड.काकडे म्हणाले की, केंद्र सरकारने असंघटित काम करणाऱ्या मजुरांसाठी ई-श्रम कार्ड योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शासन अनेक योजना राबवत असते. परंतु त्या योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहचत नाहीत. समाजातील अशा सर्व घटकातील लोकांसाठी जनशक्ती काम करते. त्यामुळे तालुक्यातील गरजू व कामगारांनी देखील ई-श्रम कार्डची नोंदणी करण्यासाठी जनशक्तीच्या इ-श्रम केंद्राला भेट देऊन ई-श्रम कार्डसाठी अर्ज करा. ई-श्रम कार्ड योजनेतंर्गत लाभार्थ्यांना अनेक फायदे मिळतात त्याचा लाभ घ्या असेही ते बोलताना म्हणाले.