पाथर्डी- करंजी घाटात कोसळला मळीचा टँकर
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात शनिवारी (दि.24) सकाळी नगरहून पाथर्डीकडे जाणारा टँकर खोल दरीत कोसळला आहे. चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने ही घटना घडली.
यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु टँकर चालक किरकोळ जखमी झाला असून, टँकरचे मात्र मोठे नुकसान झालेे.
नगरहून शनिवारी सकाळी पाथर्डीकडे मळीची वाहतूक करणारा एक टँकर करंजी घाट उतरताना चालकाचे कौठीच्या वळणाजवळ टँकरवरील ताबा सुटल्याने पंधरा ते वीस फूट खोल दरीत कोसळला. या अपघातामध्ये टँकर चालक किरकोळ जखमी झाला असून, टँकरचे मोठे नुकसान झाले. जंगलातील मोठ-मोठ्या झाडाझुडपाला टँकर अडकल्याने पुढील आणखी शंभर फूट खोल दरीत जाण्यापासून तो टँकर वाचला. टँकर कोसळल्याची माहिती मिळताच अनेक प्रवासी व ग्रामस्थांनी अपघातग्रस्त टँकरला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.