भरदिवसा टेंपो चालकाची हत्या,भितीचे वातावरण;मोठी खळबळ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरातील सुर्वे वस्तीवरील एका युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. विशाल ईश्वर सुर्वे (वय 32) असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे.
खुनाच्या घटनेमुळे खर्डा परिसरासह जामखेड तालुका हादरून गेला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील खर्डा येथील विशाल ईश्वर सुर्वे हा युवक आपल्या मालकीच्या MH 16 CD 1219 या जितो कंपनीचा छोटा टेम्पो घेऊन खर्डा शहरानजीक सुर्वेवस्तीकडे जात असताना अज्ञात इसमांनी त्याचा टॅम्पो अडवून अज्ञात कारणावरून कुठल्यातरी टणक हत्याराने विशाल याच्या डोक्याच्या डाव्या बाजूला जबर मारहाण केली. या मारहाणीत विशाल सुर्वेचा जागेवर मृत्यू झाला.खुनाच्या घटनेने जामखेड तालुका हादरला आहे . परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे .