कोपर्डी च्या श्रद्धाच्या खुनाची पुनरावृत्ती झाली.- मनिषा डांभे
पाथर्डी- प्रतिनिधी
श्रद्धा वालकर च्या हत्येने कोपर्डी च्या श्रद्धा च्या खुनाची पुनरावृत्ती झाली असून सुसंस्कृत महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना घडली आहे,तेंव्हा श्रद्धा वालकर च्या हत्याराला फाशी व्हावी अशी मागणी
पाथर्डी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या सौ.मनिषा ताई डांभे यांनी मत व्यक्त केले.महिलांवर होणारे अत्याचार, खून, बलात्कार, यासारख्या अनेक घटना रोज घडत असतात, घटनेनंतर कायद्यानुसार कारवाई होते, महिला अत्याचार वाढत आहेत, कोपर्डी च्या श्रद्धाला न्याय मिळाला नाही तोच दुसरी श्रद्धा वालकर अत्याचाराची बळी ठरली आहे, तेंव्हा श्रद्धा वालकर च्या हत्याराला,खास बाब म्हणून न्यायिक अधिकारी नियुक्त करून फास्ट ट्रॅक मध्ये खटला चालवावा व फाशीची शिक्षा व्हावी,, कोपर्डी ची घटना होऊन 6 वर्ष झाली परंतु कोपर्डी च्या ताईला न्याय मिळाला नाही त्यानंतर अनेक महिला अत्याचराच्या घटना घडल्या, तरीही आरोपी कायद्याच्या संरक्षणात मोकाट आहेत,6 महिन्यापूर्वी श्रद्धा वालकर ची हत्या करून शरीराचे 35 तुकडे करून फेकून दिले, आणि ती घटना आज समोर आली असून सुसंस्कृत महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना घडली हआहे, मुलगी मुलगा कोणत्या जातीचे आहेत हे महत्वाचे नसून ती एक महिला असल्याचं दुःख आहे,याकडे सर्वच जातीधर्मना पाहायला पाहिजे,असे केले नाही तर आरोपीला कसलीच भीती राहणार नाही, मग आणखी किती श्रद्धाचा बाली घेतला जाईल,आणि शासन त्यावर काही करणार नाही.मुलींनी सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून पाउल टाकणं गरजेचं आहे,भावनिक होऊन निर्णय घेतल्यास शेवट के होतो याचाही विचार करणे गरजेचे आहे.असेही त्यांनी मुलींना आवाहन केले.