महाराष्ट्र
तहानलेल्या बिबट्याच्या बछड्यांना बाटलीने पाजलं पाणी; वनकर्मचाऱ्याचे होतेय कौतुक
By Admin
तहानलेल्या बिबट्याच्या बछड्यांना बाटलीने पाजलं पाणी; वनकर्मचाऱ्याचे होतेय कौतुक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बिबट्याचं नाव घेतलं किंवा तो समोर दिसला तरी माणसाच्या काळजाचा ठोका चुकतो. वाढती जंगलतोड आणि सिमेंटच्या जंगलामुळे जंगली प्राणी मानववस्तीकडे पलायन केल्याच्या अनेक घटना आजकाल समोर येतात.
यामुळे समाजात अशा प्राण्यांबाबत भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, यातही काही घटना खरंच मनाला सुखावणा-या असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मी़डियावर व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. आईप्रमाणे जीव लावून वाघिणीच्या बछड्यांना अंगावर खेळवतोय हा श्वान; कारण वाचून व्हाल भावुक, पाहा यात अकोले तालुक्यातील टाकळीत आढळून आलेल्या तीन बिबट्याच्या बछड्यांना वनकर्मचारी पाणी पाजत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं.
या आगळ्यावेगळ्या व्हि़डिओची सध्या चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रात उन्हाच्या तडाक्यानं अंगाची लाहीलाही होत आहे. सध्या तापमानानेही उच्चांक गाठला असून अकोले तालुक्यात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे.
अशा परिस्थितीत जंगली प्राणी, पशु-पक्षी हेदेखील पाण्याच्या शोधात आहेत.
यातीलच हे बछडेही होते. हे बछडे पाण्याविना व्याकुळ झालेले आढळून आले. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील टाकळी गावच्या जंगलात वनकर्मचारी अशोक घुले आणि त्यांचे सहकारी जंगलात खड्डे खोदण्याचं काम करत होते. यावेळी त्यांना बिबट्याच्या बछड्यांचा आवाज आल्याने ते गुहेच्या दिशेने गेले.
त्याठिकाणी त्यांना बिबट्याचे 3 बछडे आढळून आले. बाबो! थेट जंगलाच्या राजा सिंहाशीच तरुणाने केली मैत्री, 10 वर्षे त्याच्यासोबत राहिला अखेर...; शॉकिंग VIRAL अशोक घुले यांनी ही माहिती वनक्षेत्रपाल प्रदिप कदम यांना दिल्यानंतर कदम यांनी बछड्यांना पाणी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या. कर्मचारी अशोक घुले यांनी 3 महिन्याच्या बछड्यांना एका भांड्यात पाणी उपलब्ध करुन दिलं. यानंतर ते चक्क एका बिबट्याच्या बछड्याला बाटलीने पाणी पाजत असताना दिसले (Man Gave Water to Leopard Cubs). या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात शूट केला गेला असून तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. घुले यांच्या या धकडाकेबाज तसेच डेरिंगबाज कामाचे पुन्हा एकदा प्राणी मित्र तसेच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कौतुक केले जात आहे.
सध्या महाराष्ट्रात उन्हाचा पाऱ्यानं उच्चांक (Maharashtra Weather Update) गाठला आहे.
राज्यातील अनेक तालुक्यात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. माणसांची पाण्यासाठी वणवण होत असताना जंगली प्राण्यांचे देखील पाण्यासाठी हाल होत आहेत. जंगली प्राणी, पशु-पक्षी देखील पाण्याच्या शोधात आहे. अशात एका वनविभागाच्या कर्मचाऱ्याने जंगलातील एका गुहेत जाऊन बिबट्याच्या बछड्यांना पाणी पाजतानाचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
अशोक घुले हे अनेक दिवसांपासून वनविभागात कर्मचारी म्हणून काम करत आहे. विहिरीत पडलेला बिबट्या बाहेर काढणे, मानव वस्तीत घुसलेला बिबट्या सुरक्षित बाहेर काढणे, बिबट्यांविषयी जनजागृती करणे यासह अकोले तालुक्यात बिबट्यांच्या रेस्क्यू टीममध्ये त्यांनी अनेकदा आपल्या कामाची छाप पाडली आहे.
वन कर्मचारी अशोक घुले यांच्या या धकडाकेबाज तसेच डेअरिंगबाज कामाचे पुन्हा एकदा प्राणी मित्र तसेच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कौतुक केले जात आहे.
Tags :
111101
10