महाराष्ट्र
पाथर्डी तालुक्यातील 'या' गावातून 30 टन लोखंडी गज हस्तगत; ट्रंक चालकानेच लोखंड चोरल्याप्रकरणी गुन्हा
By Admin
पाथर्डी तालुक्यातील 'या' गावातून 30 टन लोखंडी गज हस्तगत; ट्रंक चालकानेच लोखंड चोरल्याप्रकरणी गुन्हा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
चालकाने फसवणूक करून आणलेले बांधकामाचे 30 टन लोखंडी गज पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदगाव येथून हस्तगत करीत पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.
पाथर्डी व जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
जालना येथील एमआयडीसीमधून 15 जून रोजी एका ट्रकमध्ये भरलेले 30 टन लोखंड ट्रक चालक दत्तात्रय कर्डिले (रा. लातूर) याने सोलापूरला पोहोच करण्याऐवजी पाथर्डी तालुक्यातील वाळुंज व चांदगाव येथील साथीदाराच्या मदतीने चांदगाव येथील महादेव मंदिराजवळ ठेवले होते.
याप्रकरणी पाथर्डी पोलिस व जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयित सुजित सुधाकर बेळगे (रा. वाळुंज) याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोंदी पोलिस स्टेशनला ट्रक चालकाने लोखंड चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथे एका ठेकेदाराकडून पोलिसांनी लोखंड ताब्यात घेतले आहे. 30 टन लोखंडापैकी चांदगाव व घाटशिरस येथून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लोखंडाचे मोजमाप केल्यानंतर किती मुद्देमाल हस्तगत झाला, याची निश्चिती होऊ शकेल.
पाथर्डीचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलिस कर्मचारी कुमार कराड, संजय बडे यांनी जालना गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक जी. के. कौळासे, पोलिस कर्मचारी एस. सी. अटोळे, महिला कर्मचारी जयवाळ, देविदास भोजने, बी. के. खरात, सुशील कारंडे, अशोक नागरगोजे यांना तपास कामी मदत केली.
पाथर्डी पोलिसांना लागली होती खबर
फसवणुकीच्या घटनेबाबत पाथर्डी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली होती. त्या आधारे वाळुंज शिवारात प्रवीण पाटील व जालन्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून दोघा जणांचा सुमारे तीन किलोमीटर पाठलाग केला. मोटरसायकल सोडून संशयित शेतातून पळत होते. त्यातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. दुसरा पळून गेला. जालन्याचे पथक सुमारे आठ दिवसांपासून या घटनेचा तपास करत होते. मात्र, त्यांना धागेदोरे सापडत नव्हते.
रात्रीस खेळ चाले…
चांदगाव येथील महादेव मंदिराच्या समोर पटांगणात टाकलेले लोखंड स्थानिक संशयित आरोपींनी रात्रीच्या वेळी गाड्या भरून देऊन विकण्याचा प्रकार सुरू केला होता, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली.
Tags :
8368
10