दोन सख्ख्या भावांचा शॉक लागून मृत्यू; एकाच चितेवर दोघांचे अंत्यसंस्कार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कर्जत – तालुक्यातील बेनवडी येथे दोन सख्ख्या भावांचा विजेचा शॉक बसल्याने मृत्यू झाला. ही दुर्घटना आज सकाळी सहा वाजता घडली. या दुर्घटनेमुळे बेनवडी व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
दोन्ही भावावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बेनवडी येथील शेतकरी हनुमंत धुमाळ यांचा लहान मुलगा सचिन धुमाळ (वय 27) हा पत्र्याच्या शेडच्या तारेला अडकवलेली दुधाची बादली काढण्यासाठी गेला असता त्याला शॉक बसला. त्याला सोडवण्यासाठी त्याचा मोठा भाऊ अमोल धुमाळ (वय 30) धावला. त्यालाही शॉक बसला. या दोन्ही भावांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.
ही बातमी कळताच घटनास्थळी ग्रामस्थ व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन्ही भावांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अमोल धुमाळ याला अवघी सहा महिन्यांची मुलगी आहे. पत्नीचा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.