Breaking- आण्णा हजारेंच्याच विरोधात 'या' कारणांमुळे होणार उपोषण
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून दखल घेतली
जात नसल्याने राळेगणसिद्धी गावातच उपोषण करण्याचा इशारा लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे यांनी दिला आहे.
पारनेर तालुक्यातील टँकर गैरव्यवहार प्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीची भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन होणार आहे.
या मागणीसाठी रविवारी पिंपळनेर येथे संघटनेतर्फे आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आता पुढील आंदोलन थेट राळेगणसिद्धीत करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
घावटे यांनी सांगितले की, 'या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार राळेगणसिध्दी गावातील आहेत. ते जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचे नाव वापरून प्रमुख मुद्दे लपवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
तालुक्यातील आजी - माजी लोकप्रतिनिधीही आपापल्या कार्यकर्त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत', असा आरोपही त्यांनी केला. 'भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास आदर्श गाव राळेगणसिद्धी ग्रामपंचायत,
अण्णा हजारे यांचेकडेही यासंबधी तक्रार करण्यात आली होती. परंतू उपयोग झाला नाही. त्यामुळे व्यथित होऊन लोकजागृती सामाजिक संस्थेतर्फे आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले.
आरोपींवर कडक कारवाईची सद्बुद्धी संबंधितांना द्यावी, यासाठी प्रार्थना केली,' अशी माहिती संस्थेचे सचिव बबन कवाद यांनी दिली.