भाजप नगरसेवकासह सात जणांवर गुन्हा 'या' ठिकाणी घर खाली करण्यास एका कुटुंबास केली मारहाण
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राजू कारभारी गोंडगिरे (वय-48, रा. रेणुकानगर, औरंगाबाद रस्ता, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे
घर खाली करण्यासाठी अनाधिकाराने घरात घुसून कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपा नगरसेवक स्वप्नील शिंदेसह सहा ते सात जणांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू गोंडगिरे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. ते सावेडी उपनगरातील बोरा यांच्या मालकीच्या जागेत मागील 50 वर्षांपासून राहत आहेत. 11 मार्च 2022 रोजी रात्री नगरसेवक शिंदे, अभी बुलाखे आणि इतरांनी गोंडगिरे यांच्या घरामध्ये प्रवेश करून घर खाली करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घरातील संसारोपयोगी साहित्याची मोडतोड केली. घर खाली न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
शिंदे व इतरांनी यापूर्वी देखील फोन करून आणि घराचे नुकसान करून मला घर खाली करण्यासाठी त्रास दिला होता. तशी तक्रार तोफखाना पोलिसांकडे करण्यात आली होती, असेही गोंडगीरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी नगरसेवक शिंदेसह त्याच्या साथीदारांविरूद्ध विविध कलामांतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.