Breaking- 'या' कारणामुळे वनमंत्र्यांच्या दालनात करणार उपोषण; आमदार निलेश लंके यांचा इशारा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील पारनेर वनक्षेत्रात सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या गॅबियन बंधाऱ्यांच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्या सहायक उपवनसंरक्षक रमेश देवखिळे व पारनेर वनक्षेत्राचे प्रभारी वनक्षेत्रपाल प्रताप जगताप यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार नीलेश लंके यांनी आज (गुरूवार) विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून केली.
दरम्यान नियमबाह्य कामे करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जात असल्याने आत्मदहन करण्याचा इशारा वनपाल संदेश भोसले यांनी उपवनसंरक्षक कार्यालयाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.
आमदार लंके यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पारनेर वनक्षेत्रात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी नाशिक प्रदेश वनक्षेत्राच्या मुख्य वनसंरक्षकांमार्फत करण्यात येईल. येत्या आठ दिवसांत चौकशी पूर्ण करण्यात येईल. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री भरणे यांनी विधानसभेत केली.
दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत घोषणा केल्याप्रमाणे येत्या आठ दिवसांत चौकशी पूर्ण होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर वनमंत्र्यांच्या दालनात उपोषण करण्याचा इशारा आमदार लंके विधानसभेच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.
दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत घोषणा केल्याप्रमाणे येत्या आठ दिवसांत चौकशी पूर्ण होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर वनमंत्र्यांच्या दालनात उपोषण करण्याचा इशारा आमदार लंके विधानसभेच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.