इगतपुरी तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात सुरु
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा
दिनांक 21/11/22 सोमवार रोजी इगतपुरी तालुकास्तरीय 14 /17/19 वर्ष मुले यांचे कबड्डी स्पर्धा तालुका क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या. कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन महात्मा गांधी हायस्कूल पालक शिक्षक संघ चे उपाध्यक्ष डॉ. बागल यांचे शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी स्पर्धा प्रमुख विजय सोनवणे, जेष्ठ क्रीडा शिक्षक सुरेश शिंदे, संयोजक राहुल पंडित थोरात सर, दगडू तेलोरे सर, उमेश महाजन, गोडसे सर, रमेश उबाळे, उशीर सर, आहेर सर, निकम सर, पत्रकार अमोल म्हस्के, गायकर सर, दत्तू अहिरे, बाळासाहेब गाढे यांनी स्पर्धा यशस्वी करण्याकरिता प्रयत्न केले. त्याच प्रमाणे पंच म्हणून विशाल वाकचौरे, तुषार सोनवणे, म्हसणे बाळा, महेश वाकचौरे यांनी पंच म्हणून सहकार्य केले स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
14 वर्ष मुले
विजयी - M.P.G.विद्यालय मुकणे
उपविजयी -सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालय गोंदे दुमाला
17 वर्ष -मुले
विजयी-महात्मा गांधी हायस्कूल इगतपुरी
उपविजयी-न्यू इंग्लिश स्कूल ;आहुर्ली
19 वर्ष मुले
विजयी -महात्मा गांधी हायस्कूल इगतपुरी
उपविजयी-के.पी.जी.कॉलेज टाके घोटी