महाराष्ट्र
1136
10
शेवगाव- ऋषिकेश लांडे झाला "शेवगाव केसरी" किताब
By Admin
शेवगाव- ऋषिकेश लांडे झाला "शेवगाव केसरी" किताब
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शिवछत्रपती कुस्ती संकुल पारनेर येथील पैलवान युवराज पठारे यांचा पठ्ठा पैलवान ऋषिकेश लांडे यांनी पटकावला शेवगाव केसरीचा किताब
शेवगावचे मा.आ. चंद्रशेखर घुले पा. यांच्या वाढदिवसा निमित्त दि. १६ ऑगस्ट २०२२ रोजी शेवगाव येथे 'शेवगाव केसरी' किताबाच्या कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धात ओपन गटातील लढतीत अंतिम लढत शिवछत्रपती कुस्ती संकुलचा पै.ऋषीकेश लांडे व आंतराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे सरावास असणारा पै. सागर कोल्हे यांच्यात अंतिम लढत झाली. या लढतीत शिवछत्रपती कुस्ती संकुलचा पै. ऋषीकेश लांडे पा. याने सागर कोल्हे याला ११ - ४ या गुण फरकाने मात देत शेवगाव केसरी किताबाचा मानकरी ठरला. सातारा येथे २०२१ ला झालेल्या 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवान ऋषिकेश लांडे ने दुसरा क्रमांक पटकावला होता.
यावर्षी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये नक्कीच प्रथम क्रमांक मिळविल अशी अपेक्षा त्याच्याकडून शिवछत्रपती कुस्ती संकुल चे अध्यक्ष, नगरसेवक पै. युवराज पठारे यांना आहे.
याचप्रमाणे पै. आकाश चव्हाण (वजन ८० किलो प्रथम) पै. वेदांत थोरात (वजन ४५ किलो प्रथम), पै. ऋषीकेश (सोन्य) उचाळे (वजन ७० किलो द्वितिय) यांनी आप आपल्या वजनी गटात क्रमांक पटकवले आहे. हे सर्व शिवछत्रपती कुस्ती संकुल पारनेर येथे सराव करतात. अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी तालिम असुन या तालमिची ख्यातीहि महाराष्ट्र भर आहे या तालमित लहान / मोठे ७० ते ८० पैहिलवान सराव करतात. या सर्व पैलवानांना हरियाना येथील दोन प्रशिक्षक प्रशिक्षण देण्यासाठी आहे.
याच प्रमाणे शिव छत्रपती कुस्ती संकुलचे अध्यक्ष नगरसेवक युवराज पठारे यांचे सतत मागदर्शन लाभत असते. यावेळी लोकनेते मारुतराव घुले पाटील, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक पंडित काका भोसले, पैलवान बबलू भोसले, पैलवान युवराज भोसले उपस्थित होते.
शेवगाव केसरी किताब मिळवल्याबद्दल माजी आमदार विजयराव औटी, जिल्हा परिषद बांधकाम कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांनी पैलवान ऋषिकेश लांडे यांचे अभिनंदन केले आहे.
Tags :

