दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे संघटन होण्यासाठी व त्या संघटनेच्या माध्यमातून महाविद्यालयासाठी विविध विद्यार्थी उपयोगी उपक्रम राबवण्याचे हेतूने दादापाटील राजळे महाविद्यालय माजी विद्यार्थी संघ या संस्थेची नोंदणी करण्यात आलेली आहे. या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्रीकांत मिसाळ, उपाध्यक्ष ,विक्रम राजळे,सचिव, निर्मला काकडे,सदस्य,चारुदत्त वाघ, अंकुश राजळे, अशोक वांढेकर, कानिफ पाठक, निलेश काजळे, सुनंदा बडे ,उमेश तिजोरे, चंद्रशेखर उबाळे, अमोल आगासे हे उपस्थित होते. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी या माजी विद्यार्थी संघामध्ये नोंदणी करून या संघाचे सभासदत्व स्वीकारावे असे आवाहन या वेळी प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी केले.