श्री आनंद महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन साजरा
पाथर्डी- प्रतिनिधी
श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी येथे शनिवारी 'जागतिक वसुंधरा दिन' साजरा करण्यात आला."पर्यावरणाचे संवर्धन "या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा.जगदीश बुधवंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना पर्यावरणाविषयी सखोल मार्गदर्शन केले . भूगोल विभागातील प्रा. डॉ. विजयकुमार जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास व वसुंधरा संरक्षणाची गरज याविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पर्यावरण रक्षणाची गरज व पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अमोल महाजन यांनी केले तर प्रा. डॉ. सतिष दरवडे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला प्रा. अनंत राख, प्रा. डॉ.विकास गाडे,प्रा. डॉ.मुक्तार शेख, प्रा. जायभाये आदी उपस्थित होते.तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.