गोंदकर कुटुंबीयांची मोहटादेवी चरणी नवसपूर्ती
पाथर्डी- प्रतिनिधी
माजी मंत्री व शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना गतवर्षी दुसऱ्या लाटेत कोरोनाची लागण झाली होती.
मतदारसंघातील अनेकांनी विखे पाटील या महाभयंकर कोरोनातून बरे व्हावे, यासाठी प्रार्थना केल्या. ते लवकर बरे व्हावेत यासाठी शिर्डीचे माजी नगरसेवक तुषार आबा गोंदकर यांनीही मोहटा देवी चरणी साकडे घातले होते.
सोमवारी त्यांनी सपत्निक नवसपूर्ती करून मोहटा देवी चरणी चांदीची भांडी अर्पण केली.
यावेळी मोहटादेवी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, पाथर्डीचे नगरसेवक प्रसाद आव्हाड व युवा नेते प्रशांत शेळके उपस्थित होते.