भुईकोट किल्ला,रणगाडा संग्रहालय 'या' दिवशी बंद राहणार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्ह्यात विशेषत: अहमदनगर शहर व भिंगार कॅम्प हद्दीत कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. यामुळे दरवर्षी २६ जानेवारीला नागरिकांना पाहण्यासाठी खुले असलेला भुईकोट किल्ला आणि रणगाडा संग्रहालय यंदा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामुळे २६ जानेवारीच्या दिवशी या दोन्ही ठिकाणी नागरिकांनी येऊ नये, असे आव्हान भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी केले आहे. जिल्ह्यात दररोज एक ते दीड हजार कोरोना बाधित रूग्ण आढळून येत आहे. अहमदनगर शहरात दररोज तीनशे ते पाचशे रूग्ण समोर येत आहे. वाढती रूग्णसंख्या धोक्याची असल्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे.