शाळकरी विद्यार्थ्याची घरातच गळफास घेऊन आत्महत्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात राहणाऱ्या वर्षीय विद्यार्थ्यांने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घडना घडली असून दिनांक ९ फेब्रुवारी रोजी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.
वांबोरी परिसरात राहणारा विद्यार्थी ओंकार विलास कुसमुडे( वय १७ ) याने आपल्या राहात्या घरात स्लॅबच्या हुकाला सुताच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.
नातेवाईकांनी त्याला वांबोरीच्याबप्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी मयत झाल्याचे राहुरी पोलिसांना कळविल्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
ओंकार मुसमाडे या विद्यार्थ्याने नेमकी कोणत्या कारणाने गळफास घेवून आत्महत्या केली, याचा पुढील तपास पो नि. प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. पारधी हे करीत आहेत.