पत्नीचा भर रस्त्यावर खून करुन पती फरार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील राशीन येथे भररस्त्यावर पत्नीचा निर्घुणपणे चाकुने खून करून पती फरार झाला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
राशीन येथे सिद्धटेक रस्त्यावर आज राहुल सुरेश भोसले (रा. पांडे, ता. करमाळा) याचे त्याची पत्नी दिपाली हिच्याबरोबर भांडण झाले. या रागा मधून त्याने पत्नीवर चाकूने हल्ला केला. यामध्ये एक वार पत्नीच्या गळ्यावर केल्यामुळे ती जागीच ठार झाली. यावेळी पत्नीच्या सोबत असलेल्या तिच्या बहिणीवर देखील राहुल भोसले याने चाकूने वार करून तिला जखमी केले आहे. या घटनेनंतर राहुल भोसले हा फरार झाला असून पोलिस पथके त्याच्या मागावर आहेत. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.