गुन्हेगारावर पोलिसांचा वचक राहीलेला नाही.'या' ज्येष्ठ समाजसेवकाने केली चिंता व्यक्त
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सरकारच्या भूमिकेबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. तालुक्यातील जवळे याठिकाणी सोळा वर्षीय मुलीची झालेल्या संशयास्पद हत्येवर अण्णा हजारे यांनी सरकारमध्ये बसलेल्या व्यक्तींच्या भूमिकेवर चिंता व्यक्त केली आहे. पोलिस प्रशासनाचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
राज्याच्या गृहमंत्रीपदी राहिलेल्या व्यक्तीवरच जर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असतील, तर गुन्हेगारांवर धाक काय राहणार ? महिला आणि विशेषतः अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार, बलात्कार ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नसल्याने असे प्रकार होत असल्याचे स्पष्ट करताना हजारे पुढे म्हणाले, ‘येत्या अधिवेशनात यावर कठोर कायदा करावा. गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. त्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत.’
दरम्यान, आपल्याच तालुक्यातील एका गावात सोळा वर्षीय मुलीवर घडलेल्या प्रकारावर अण्णा भावूक झाल्याचे दिसून आले. काय या मुलीचा दोष, असे म्हणत अण्णांनी गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही. आता गुन्हेगार शोधून त्यांना तातडीने कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.