भाजपचे आमदार शिवसेना, राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण, भारतीय जनता पक्षातील अनेक आमदार हे सत्ताधारी शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे काही आमदार हे येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपला मोठं खिंडार पाडण्याची तयारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. भाजपच्या काही आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित मानला जात असून पुढील आठवड्यात हा प्रवेश होण्याची शक्यता आहे. तर काही आमदार हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने मोठी रणनीती आखली असल्याचं बोललं जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तर काही आमदारांनी स्थानिक परिस्थिती पाहता शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता भारतीय जनता पक्षातील हे आमदार कोण आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.