मुख्यमंञ्यांच्या विधानावर विखे यांची सूचक प्रतिक्रिया
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो. त्यामुळे काहीही चमत्कार होऊ शकतो, असे सूचक विधान भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी केलेे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलेे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेतील एका कार्यक्रमात विरोधकांचा उल्लेख "भावी सहकारी", असा केला होता. त्यानंतर भाजप नेत्यांनी युतीचे संकेत दिले होते. आता त्यात राधाकृष्ण विखे यांनी उडी घेतली आहे. विखेे यांनीही सूचक विधान करून युतीच्या चर्चांना हवा दिली आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. महाविकास आघाडीची जी मोट बांधली गेली आहे. त्याला काही वैचारिक आधार नाही. सत्तेसाठी हे लोक एकत्रं आले आहेत. सत्ता नसतानाही शिवसेना-भाजपाने 20-25 वर्ष एकत्र राहून काम केले आहे. त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्याचे स्वागतच केले पाहिजे, असे विखे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कालचे विधान हे त्यांचे व्यक्तिगत मत होते. पण सध्या राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कुणाचा मित्रही नसतो. त्यामुळे काही चमत्कार होऊ शकतो, असेेेेही ते म्हणाले. या वेळी त्यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस पक्षामध्ये नेते पक्षाचं हित पाहण्यापेक्षा व्यक्तिगत हित पाहण्याकडे काँग्रेसच्या मंत्र्यांचे लक्ष आहे, तर काँग्रेसने आता मुंगेरीलालचे स्वप्न पाहू नयेत, असा चिमटाही त्यांनी काढला.