गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका आरोपीसह अल्पवयीन मुलास पोलिसांकडून अटक-
अहमदनगर- प्रतिनिधी
गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह एका आरोपीस व एका अल्पवयीन मुलास शेवगाव पोलीसांनी सोमवारी (दि.8) जेरबंद केले आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, शेवगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोनोशीवरून नांदूरकडे जाणार्या रस्त्यावरील खंडोबा मंदिर जवळील लिंबाच्या झाडाखाली बाबासाहेब दादाबा ढाकणे (वय 27, रा. भारजवाडी, तालुका पाथर्डी) व एका अल्पवयीन मुलास गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह पोलिसांनी पकडले आहे.
यासंदर्भात पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान बडधे,
दिलीप राठोड, राजू ढाकणे, भानाजी काळोखे व गणगे यांनी ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे व पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
आरोपीविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल भानाजी काळोखे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.