महाराष्ट्र
115
10
पाथर्डी तालुक्यात विविध ठिकाणी सेवालाल महाराज जयंती साजरी
By Admin
पाथर्डी तालुक्यात विविध ठिकाणी सेवालाल महाराज जयंती साजरी
पाथर्डी प्रतिनिधी
श्री नवनाथ विदयालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी*
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील श्री नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाच्या वतीने दि .१५ फेब्रुवारी रोजी थोर मानवतावादी निसर्गप्रेमी संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
भारत ही संताची भूमी म्हणून ओळखली जाते. भारतात अनेक संत महात्मे होऊन गेले .त्यापैकीच एक थोर संत सेवालाल महाराज होय. त्यांचा जन्म आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्हायातील गुत्ती तालुक्यात झाला. आज त्या गावाला सेवागड या नावाने ओळखले जाते. १५ फेब्रुवारी १७३९ मध्ये महाराजांचा जन्म झाला. अशा मानवतावादी निसर्ग प्रेमी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला प्राचार्य दत्तात्रय अकोलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य दत्तात्रय अकोलकर म्हणाले की, सत्य हाच खरा धर्म आहे. जीवनात नेहमी सत्तेचे आचरण करावे. नम्रता, लीनता, प्रेम, निसर्ग, पूजा अहिंसा या गोष्टी महाराजांनी समाजाला दिल्या. अशा सामाजिक कार्याची माहिती यावेळी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
प्रास्ताविक संदीप चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन स्वप्नील लवांडे यांनी केले. आभार ज्येष्ठ शिक्षक सिताराम बेरड यांनी मानले.
यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक रविंद्र भापसे सर ,नारायण पिंपळे , कल्पना जिवडे, सुनिता आठरे , सविता शिंदे,अंजली फलके , स्वाती कार्ले , सागर घोरपडे , चंद्रकांत शिंदे, श्रीकांत शिंदे, अशोक खोडके , ऋषी गर्जे , अशिष आचारी ,श्रीकांत अकोलकर यांच्यासह विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
*आंबेवाडी तांडा येथे संत जगद्गुरु सेवालाल महाराज यांना अभिवादन*
पाथर्डी तालुक्यातील आंबेवाडी तांडा येथे संत जगद्गुरू श्री सेवालाल महाराज यांची २८३ वी जयंती आमदार मोनिकाताई राजळे व पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांचे प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.
यावेळी निवडुंगे ग्रामपंचायत सरपंच विठ्ठल कोलते, ग्रामपंचायत सदस्य मयूर चव्हाण, भाऊसिंग राठोड, मानसींग राठोड, अरविंद चव्हाण, अर्जुन चव्हाण, रविंद्र चव्हाण, सुभाष राठोड, दिलीप राठोड, अनिल चव्हाण व तांड्यातील सर्व ग्रामस्थ तसेच महिला मंडळ यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढून जयंती साजरी करण्यात आली.
*कोरडगावात सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी*
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे सद्गुरु, राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी वाद्यसह मिरवणूक काढण्यात आली होती.
याप्रसंगी कोरडगाव चे सरपंच रविंद्र (भोरू सेठ) मस्के, तोंडोळी ग्रामपंचायतीचे सरपंच बाबासाहेब राठोड, उपसरपंच सतीश वारंगुळे, प्रमोद देशमुख, सुरेश जाधव, आकाश म्हस्के, अश्पाक शेख व कोरडगाव गणातील ग्रामस्थ तसेच जय भद्रा ग्रुप कोरडगाव येथील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
माणिकदौंडी येथील रत्न जैन विद्यालयात सेवालाल महाराजांना अभिवादन
पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील श्री रत्न जैन विद्यालयांमध्ये सद्गुरु राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या जयंती साजरी करण्यात आली.
सुरुवातीला त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम माळी, पर्यवेक्षक अनिल पटवा, सूर्यभान दहिफळे, नवनाथ बुचकुल, संजय राठोड, लक्ष्मण आरणे, अविनाश नरवडे, सुमित फलके, निलेश शिरसाट, प्रदीप कीर्तने, निलेश साखरे, महावीर कर्नावट, समाधान आराख, संदीप खेडकर आदींची उपस्थिती होती.
Tags :

