निवडुंगे- मढी रस्त्यांवर चिखलाची 'रांगोळी'; वाहनचालक ञस्त
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील निवंडुगे परीसरात गेल्या तीन महीन्यापासून पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असताना गावातील मढी गावाकडे जाणाऱ्या रस्त्या पाण्याचे गटार बनला असून रस्त्यावर खड्डे मोठे खड्डे पडले असून रस्ता जलमय झाला आहे. रखडलेल्या कामामुळे ठिकठिकाणच्या खड्डे त्यात साचलेले पाणी या भयानक परिस्थितीमुळे निवडुंगे ग्रामस्थ तसेच वाहनचालकाचा संताप होत आहे. रस्त्यावर चिखलाने 'रांगोळी' रेखाटल्याचे विदारक चित्र तयार झाले आहे. प्रशासन व लोक प्रतिनिधी यांचे रस्त्याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.रस्त्यावर साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी मुरुम,दगड टाकून साचलेले पाणी रस्त्याच्या बाजूने काढून देणे गरजेचे आहे.परंतु ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष देत आहे.
सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांची प्रचंड बिकट अवस्था झाली असून, त्यामुळे वाहनधारक, पादचारी सर्वच त्रस्त आहेत.तसेच काही वेळा वाहनचालक रस्त्यावर घसरुन पडून जखमी झाले आहेत.
गावातील रस्त्याची दुरावस्था अत्यंत वाईट झाली असून येथे राहणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरील पाण्याच्या गटारीमुळे तसेच घाणीचे प्रमाण वाढल्याने डासाचे प्रमाण वाढले असून ग्रामस्थांना यामुळे आजाराला आमञंण मिळत आहे.लवकरच रस्त्याची झालेली अवस्थेकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी निवडुंगे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष चंद्रकांत मरकड तसेच ग्रामस्थांनी केली आहे.