शेततळ्यात बूडून तीन मुलांचा मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव जवळ असणाऱ्या कान्हेगाव येथील शेततळ्यात बुडून तीन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कान्हेगाव येथे सकाळी काही लहान मुले तलावाच्या ठिकाणी खेळण्यासाठी गेले
होते. यापैकी चैतन्य अनिल माळी (वय १२), दत्ता अनिल माळी (वय ८) व चैतन्य शाम बर्डे (वय ४) ही तीन लहान मुळे खेळता खेळता कान्हेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेततळ्याजवळ गेली. पावसाचे पाणी या तळ्यात साचलेले होते. या मुलांना पाण्याचा अंदाज आला नाही व तिघेही पाण्यात बुडून मयत झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी गोळा झाले. तिन्ही मुलांचे शव बाहेर काढुन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक
साळवे यांनीही घटनास्थळी भेट दिली. मृत पावलेली तिन्ही लहान मुले गरीब कुटुंबातील आहेत.