शेतकऱ्यांना पुर्ण क्षमतेने विज देऊन न्याय द्यावा- शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे
उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
पाथर्डी - प्रतिनिधी
महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना पैसे भरण्यासाठी तगादा लाऊन ज्याप्रमाणे सक्तीची शेतकऱ्यांकडून विज बिल वसुली केली, त्याप्रमाणे शेतकऱ्यांना पुर्ण क्षमतेने व पुर्ण वेळ विज मिळत नाही. त्यामुळे ज्या प्रमाणे विजबिल वसुलीसाठीच तत्परता दाखवली, त्या प्रमाणे भारनियमन मुक्त पुर्ण क्षमतेने पुर्ण वेळ विज शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने द्यावी, तसे आदेश महावितरण कंपनीस महाराष्ट्र शासनाच्या वतीने उर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरण कंपनीस काढावेत व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी अहमदनगर राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा किसान मोर्चाचे अहमदनगर दक्षिणचे सरचिटणीस शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी पत्राद्वारे उर्जामंत्री नितीन राऊत यांना केली आहे.
ढाकणे यांनी पत्रात म्हटले आहे की,गेली दोन वर्षापासुन पाऊस चांगला आहे. त्यामुळे बागायत क्षेत्र वाढले असुन ऊस लागवडीचे प्रमाण वाढले आहे. विहीरीस पाणी आहे .परंतु विज वेळेवर व पुर्ण क्षमतेतेने येत नसल्यामुळे तसेच अनेक ठिकाणी विद्युत रोहीत्र जळाल्यानंतर ताबडतोब विद्युत रोहीत्र बदलून देत नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके महावितरण कंपनीच्या हालगर्जीपणामुळे वाळुन जाऊन पिंकांचे अतोनात नुकसान होत आहे. महावितरणच्या या हलगर्जी कारभारामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी असुन देखील पुर्ण क्षमतेने पुर्ण वेळ विद्युत मिळत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांना पुर्ण क्षमतेने व पुर्ण वेळ विद्यूत देण्यासाठी आपण तातडीने निर्णय घेऊन महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने पुर्ण वेळ शेतीसाठी विद्यूत देण्यासाठी आदेश द्यावेत आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी उर्जामंत्री राऊत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.