पुण्यस्मरणार्थ इतर खर्चाला फाटा देऊन गायकवाड कुटुंबाचा आगळावेगळा उपक्रम
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथील तिसगाव येथील मातोश्री लॅबोरेटरीचे संचालक विठ्ठल गायकवाड व मुकुंद गायकवाड यांचे वडील कै, आसाराम राधाकृष्ण गायकवाड यांच्या 11 व्या पुण्यस्मरणार्थ निमित्ताने, निराधार, विधवा, अपंग,व गरजु कुटुंबाला 25, किराणा मालाचे किटचे वाटप करण्यात आले.
तसेच गावातील गणेश तरुण मंडळाने उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने समाज प्रबोधन व शांतता मय कार्यक्रम आयोजित केल्या मुळे गावातील पाच गणेश तरुण मंडळाला प्रथम क्रमांक, द्वितिय क्रमांक , तृतीय क्रमांक आणि उत्तेजनार्थ दोन असे पाच गणेश तरुण मंडळाला ट्रॉफी , शाल ,श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नामदेव लबडे नगरसेवक पाथर्डी हे अध्यक्षस्थानी होते. तसेच मा.श्री ॲड.लक्ष्मणराव पोकळे, जिल्हा अध्यक्ष प्रहार व दिव्यांग संघटना, स्वाभिमानी मराठा महासंघाचे अध्यक्ष डाॕ.कृषिराज टकले, शिवसेना तालुकाध्यक्ष अंकुश चितळे, उपाध्यक्ष नवनाथ वाघ, हनुमान टाकळी गावच्या सरपंच सौ. मिनाताई शिरसाठ,अजय रक्ताटे, अशोक काजळे, अमोल वाघ, चारुदत्त वाघ, सुभाष दगडखैर, आण्णासाहेब दगडखैर, बाबासाहेब बर्डे, डॉ. रामदास बर्डे, सुभाष बर्डे,कुशिनाथ बर्डे, निलेश काजळे, धोंडीराम बर्डे,
भाऊसाहेब बलफे आदी मान्यवर, ग्रामस्थ व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णु गायकवाड यांनी केले तर मुकुंद गायकवाड व योगेश गायकवाड यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठलराव गायकवाड यांनी केले तसेच सहकार्य शिरीष गायकवाड तसेच मिञ परीवार व ग्रामस्थ यांनी केले.