खेर्डा फाटा ते पागोरी पिंपळगाव रस्त्याचे काम तात्काळ सुरु करा, अन्यथा आंदोलन- ढाकणे
पाथर्डी- प्रतिनिधी
ग्रामस्थांच्यावतीने शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी दिला आंदोलनाचा इशारा
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील खेर्डा फाटा ते खेर्डे,लोखंडवाडी, सांगवी व पागोरी पिंपळगांव हा रस्ता अत्यंत खराब झाला असुन रस्त्यावर मोठ- मोठे खड्डे पडले आहेत तसेच पावसामुळे काही ठिकाणी रस्ता खोदून निघाला असल्यामुळे पागोरी पिंपळगांवहून पाथर्डीला येण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहनांना जीव धोक्यात घालुन मोठया कसरतीने वाहने चालावी लागतात.
सदरचा रस्ता पागोरी पिंपळगांवहून पाथर्डीला जाण्यासाठी कमी अंतराचा असुन सदरच्या रस्त्याने नेहमी वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्ता नादुरुस्त असल्यामुळे वेळही जास्त लागतो आणि मोठ-मोठया खड्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने सदरचा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे जिल्हाध्यक्ष तथा अहमदनगर दक्षिणचे भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी परीसरातील लोकांच्या वतीने सबंधीत विभागास केली आहे.
सदच्या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम खात्याने सर्वे करुन तातडीने नवीन रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मंजुरी देऊन सदरच्या रस्त्याचे काम एक माहिन्याच्या आत मार्गी लावावे, अन्यतः खेर्डे,लोखंडवाडी, सांगवी, पागोरी पिंपळगांव ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा सबंधीत गावच्या ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनीक बांधकाम खात्यास शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी दिला आहे .