मुळा धरणातून उजव्या कालव्यातून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सुरु
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 11 मे 2021, मंगळवार
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेती सिंचनाचे शेवटचे उन्हाळी पाणी आवर्तन ७०० क्युसेसने मंगळवारी सोडण्यात आले आहे.
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी शेवटचे आवर्तन ७०० क्युसेसने सोडण्यात आले आहे . हे आवर्तन सुमारे ४० दिवस सुरु राहणार आहे. या पाण्यामुळे सुमारे ३० हजार हेक्टर शेती क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
नगर जिल्ह्यात सर्वात मोठे व जिल्ह्याचे जलसंजवणी म्हणून ओळखले जाणारे मुळा धरण २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता आहे आजमितीला धरणात १३ हजार ९२२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी ९ हजार ४२२ इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. उजव्या कालव्याच्या आवर्तनातून सुमारे ५ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपयोगात येणार आहे. मुळा धरण सलग तीन वर्ष काठोकाठ भरले आहे . यंदा मुळा धरणात वाढीव पाणीसाठा दीड हजार दशलक्ष घनफूट शिल्लक राहणार आहे. त्याचा उपयोग पुढील हंगामासाठी करण्यात येणार आहे. उप अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी याबाबत माहिती दिली.