पाथर्डी येथे आरोग्य केंदावर लसीकरणासाठी तुफान गर्दी,सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - शुक्रवार 07 मे 2021
पाथर्डी लसीकरणासाठी नागरीकांची तुफान गर्दी झाली असून कुठेही सोशल डिस्टंसिंग नाही किंवा नियमांचे पालन नाही. प्रशासनाकडून सर्वत्र दुर्लक्ष, कोणीही वैद्यकीय अधिकारी किंवा प्रशासनातील कुठलाही अधिकारी याठिकाणी उपस्थित नसल्यामुळे नागरिकांनी तुफान गर्दी केली आहे. 6 मे ते 16 मे गाव बंद करून संपूर्ण लॉकडाऊन कशासाठी केले. कोरोनाला अटकाव होण्यासाठीच ना? या ठिकाणी पोलिस बंदोबस्त किंवा प्रशासकीय अधिकारी उपस्थित का नाही? असा नागरिकांमधून संतप्त सवाल विचारण्यात येत आहे.