लसीकरणसाठी
18 ते 44 वयातील व्यक्ति ऑनलाइन नोंदणी साठी झालेत बेजार,
प्रशासन ही हतबल, तर राजकीय लोकांचेही दुर्लक्ष
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 10 मे 2021 सोमवार
कोरोनाच्या काळात नागरिकांना आशेचा किरण ठरू पाहणाऱ्या लसीचे गौडबंडाळ, ज्यां जेष्ठ नागरिकांनी विश्वासाने पहिली लस घेतली आहे त्यांना दुसरी न मिळणे, 18 ते 44 च्या व्यक्तींना लसीसाठी तासन तास मोबाइल कडे पाहत बसावे लागणे, यावर उपाय तालुका स्तरिय अधिकाऱ्याना काहीच माहिती न देता येणे व या सर्व प्रकारात ज्याचे कडे मोठ्या आधाराने पाहिले तर जाते त्या राजकीय नेत्यांनी तेरी भी चूप मेरी भी चूप याचा अवलंब करत जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे यामुळे सर्व सामान्य नागरिक पुरता हैराण झाला असून प्रशासनाने योग्य पद्धतीने लोकांना माहिती द्यावी, आहे की त्या वेळी व्यवस्थेत सुधारणा करावी अन्यथा लोकांच्या सहन शक्तीचा उद्रेक झाल्याशिवाय या राहनार नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे.
कोरोना मुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे, सर्व व्यवहार बंद असताना ज्याची चलती आहे त्याचे अनेक बाबी डोळ्या देखत सुरू आहेत, अनेक लोक रस्त्यावर बिन दिक्कत फिरत आहेत, सर्व सामन्यांना मात्र दंड होत आहे यातुन कोरोनाचा धुमाकुळ सुरू आहे, तालुक्यात व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नाही, कोरोना तपासणीसाठी आवश्यक स्कोर तपासणीची एच आर टी सी ची सुविधा नाही, कोरोना झालेल्या लोकांना बेड मिळत नाही, रेमसीडीयर मिळत नाही ऑक्सिजन मिळत नाही ही चर्चा होत असताना व कोरोनाचा आकडा कमी होताना दिसत नसताना लसीकरण महत्वाचे वाटू लागल्याने अनेकांचा लस मिळविण्यासाठी आटापिटा सुरू झाला मात्र लसीकरनात ही मोठा गोंधळ सुरू झाला आहे, 45 च्या वरती वय असलेल्या काही लोकांनी पहिली लस घेतली असली तरी त्यांना दुसरी लस गेली काही दिवसापासून मिळायला तयार नाही, तर अनेक जेष्ठ नागरिक अजून ही लसीच्या पहिल्या डोसची चातका सारखी वाट पाहत आहेत. मात्र ती मिळायला तयार करण्यात नाही याबाबत प्रशासन ज्याला म्हटलं जातं ते कोणीच काहीच माहिती स्वतः हुन द्यायला तयार करण्यात नाहीत. लोकां साठी पत्रकारांना या अधिकार्या च्या मागे लागून माहिती मिळवावी लागत आहे.
जेष्ठ नागरिकांची लसीकरणाबाबत वाईट अवस्था असताना 18 ते 44 च्या लोकांचे लसीकरण शासनाने सुरू केले आहे त्यामध्ये ही मोठा गोंधळ सुरू असून दिवसात अवघ्या 200 लोकांचे बु