महाराष्ट्र
176615
10
खडकेद शाळेत लोकशाही मार्गाने निवडणूक
By Admin
खडकेद शाळेत लोकशाही मार्गाने निवडणूक
कवडदरा -इगतपुरी तालुक्यातील कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या खडकेद येथील प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रम शाळेत लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी एकूण आठ उमेदवार रिंगणात होते.आठही उमेदवारांचे फॉर्म तपासणी करून पुढील कार्यवाही सुरु करण्यात आली. प्रचार करण्यासाठी वेळ देखील देण्यात आला. प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने चिन्हे वाटप करण्यात आले. प्रचार संपल्यावर आचार संहिता देखील ठेवण्यात आली. दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. प्रत्येकाचे ओळखपत्र बघून मतदान घेण्यात आले. यावेळी 1 ली ते 12 पर्यंतच्या सर्व मतदारांनी आपापल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान पूर्ण झाल्यानंतर उमेदवार व प्रतिनिधी यांच्या समोर एकूण मतदानाच्या चार फेऱ्या नुसार मतमोजणी करण्यात आली. या चार फेऱ्या अंति निकाल घोषित करण्यात आला. या एक नंबरची मते मिळतील त्याला शालेय मुख्यमंत्री तर दोन नंबर ची मते मिळतील त्याला उपमुख्यमंत्री असेल यानुसार झालेल्या चूरशीच्या लढातीत अखेर सर्वाधिक मते मिळवत अनिल भाऊ सावंत(10 वी)याने मुख्यमंत्री पदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली तर उपमुख्यमंत्री पदासाठी दुसऱ्या तिसऱ्या फेरी अखेर आघाडीवर असलेले विशाल यशवंत भारमल पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फेरीत आघाडीवर असलेले अचानक पिछाडीवर गेले चौथ्या फेरी अखेर अचानक एक मताने आघाडी घेत मंगल पांडुरंग खतेले(12वी विज्ञान) उपमुख्यमंत्री पदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली,शिक्षणमंत्री-विशाल यशवंत भारमल(12 वी), सांस्कृतिक मंत्री-आरती दिनकर खतेले (9वी)शालेय शिस्त मंत्री-स्नेहा रामदास दिघे (11वी)क्रीडा व सहल मंत्री-साई लहु भांगरे (9वी)पर्यावरण व वनसंरक्षण मंत्री-विजय गोविंद लोहकरे(11वी). आरोग्य व स्वच्छता मंत्री-सुशाली बाळू वाघ (11वी) या सर्व मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आज आपापल्या पदाची शपथ घेतली. यावेळी निवडणुकीचे कामकाज मुख्याध्यापक सुरेश निगळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी मुख्याध्यापक विजय पाटील व सुरेश निगळे यांनी सर्व नवनिर्वाचितांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
----------------------------------------------------------------------प्रतिक्रिया-
लोकशाहीच्या दृष्टीकोनातून आमच्या आदिवासी विद्या प्रसारक समाज घोटी बु. शैक्षणिक संस्थेच्या प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रमशाळा खडकेद येथे शैक्षणिक वर्ष 2025/26 वर्षातील शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक लोकशाही पद्धतीने प्रत्यक्ष मतदान घेऊन पार पडली. यानुसार आतापासूनच विद्यार्थ्यामध्ये लोकशाही चे धडे मिळाले. अतिशय स्तुत्य असा उपक्रम घेतला त्याबद्दल धन्यवाद व सर्वाना पुढील वाटचालीस शुभेच्छा
-बाळासाहेब शिवराम झोले -व्यवस्थापक (आदिवासी विद्या प्रसारक घोटी बु.)
Tags :
176615
10





