महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उभारणार; लोकायुक्तांच्या दणक्यानंतर अखेर एसआयटी स्थापन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलावर्गासाठी स्वच्छतागृहांची पुरेशी उपलब्धता करण्याच्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश लोकायुक्तांनी दिले आहेत.
त्यानुसार राज्य सरकारने सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केली.
मुंबईतील ओव्हल मैदान; तसेच राज्यातील इतर मैदाने; तसेच मुंबईत कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याच्या वृत्ताची लोकायुक्तांनी दखल घेतली आहे. त्यानुसार आता या प्रकरणी सूचना करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देशही दिले होते. आता त्या निर्देशानुसार ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) या समितीचे अध्यक्ष असतील.