महाराष्ट्र
23638
10
इगतपुरी तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न
By Admin
इगतपुरी तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न
नगर सिटीझन live न्युज नेटवर्क
इगतपुरी तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा गोंदे दुमाला येथील श्री सिद्धीविनायक माध्यमिक व ज्यूनिअर काॕलेजमध्ये (दि.०३ व ०४)उत्साहात संपन्न झाल्या.तालुक्यातील शाळा-काॕलेज अनेक संघानी स्पर्धेत सहभागी झाले होते.या स्पर्धा उद्घाटन साठी प्रमुख मान्यवर मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे संचालक संदीप गुळवे रमेश जाधव, गोंदे दुमाला शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन तथा सभापती कृ.ऊ.बा.समिती घोटी, माजी सरपंच गणपत जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पगार सर गोंदे केंद्राचे केंद्रप्रमुख अनंत बिऱ्हाडे ,शोभा एक्वा चे संचालक राजेंद्र नाठे,भाजपा युवा मोर्चा इगतपुरी तालुका सरचिटणीस सागर नाठे,
इगतपुरी तालुका क्रीडा प्रमुख दगडु तेलोरे, माजी तालुका क्रीडा प्रमुख विजय सोनवणे
शाळेचे प्राचार्य पी.जे. देवरे,मुख्याध्यापक अशोक उशीर, अमोलराजे म्हस्के,क्रिडा शिक्षक राहुल पंडीत,आहेर सर,आर.बी.उबाळे,धाञक सर,आहेर सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद व व कर्मचारी व क्रीडा शिक्षक यु.आर. महाजन तालुक्यातील अनेक क्रीडा शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते. स्पर्धा अतिशय शिस्त बद्धपणे पार पडल्या.
कबड्डी स्पर्धा निकाल मुले- पुढील प्रमाणे-१४ वर्षे वयोगटातील मुले प्रथम क्रमांक- न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज वाघेरे,व्दितीय क्रमांक-न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा,तृतीय क्रमांक- माध्यमिक विद्यालय वाडीव-हे-१७ वर्ष वयोगटातील प्रथम क्रमांक-न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा,व्दितीय क्रमांक-एमपीजी विद्यालय मुकणे,तृतीय क्रमांक-भैरवनाथ माध्यमिक खेड,१९ वर्षे वयोगटातील प्रथम क्रमांक स्पीडवेल स्कूल वाडीव-हे,व्दितीय क्रमांक- एम.जी.हायस्कूल इगतपुरी,तृतीय क्रमांक भैरवनाथ माध्यमिक खेड,कबड्डी स्पर्धा मुली निकाल पुढीलप्रमाणे- प्रथम क्रमांक- एम.जी.हायस्कूल इगतपुरी,व्दितीय क्रमांक-श्री सिद्धीविनायक माध्यमिक व ज्यूनिअर काॕलेज गोंदे दुमाला,तृतीय क्रमांक-भैरवनाथ माध्यमिक खेड,१७ वर्षे वयोगटातील मुली प्रथम क्रमांक-न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज वाघेरे,व्दितीय क्रमांक-न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा,तृतीय क्रमांक-एम.जी.हायस्कूल इगतपुरी,१९ वर्षे वयोगटातील मुली प्रथम क्रमांक-एम.जी.हायस्कूल इगतपुरी,व्दितीय क्रमांक-व्हि.एन.पाटील माध्यमिक इगतपुरी यांना मिळाला आहे.तसेच तालुक्यातील अनेक शाळा-काॕलेजचे कबड्डी संघाचा उत्कृष्ट खेळ मैदानावर दिसून आला.यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील जिल्हा स्तरावरील स्पर्धासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.स्पर्धा यशस्वीरीत्या आनंदमय वातावरणात संपन्न झाल्या.
Tags :
23638
10




